शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : रत्नागिरीत कोरोनाने घेतला पोलिसाचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 15:58 IST

रत्नागिरी पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा वसंत पाचेरकर यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात सुरू होते उपचारबिनतारी संदेश विभागात पोलीस उपनिरीक्षक

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा वसंत पाचेरकर यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मागील दोन दिवसांपासून त्यांना जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले होते. रत्नागिरी पोलीस दलातील कोरोनामुळे हा पहिलाच बळी गेला असून, या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.ज्योतिबा वसंत पाचेरकर हे पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक खालवली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्याने त्यांचा मृत्यू झाला.रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच कोरोनापासून नागरिकांची संरक्षण होण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून पहारा देत आहेत.

जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातही कोरोनाने शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून ते पुन्हा सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी पोलिसांसाठी कोविड सेंटर सुरू केले होते. पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव वाढत असून, त्यातच ज्योतिबा पाचेरकर यांचा मृत्यू झाला. पाचेरकर यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसDeathमृत्यूRatnagiriरत्नागिरी