corona virus : रत्नागिरीत कोरोनाचे ६३ नवे रुग्ण, ५ रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:43 IST2020-09-23T14:42:30+5:302020-09-23T14:43:33+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी ६३ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६८३२ झाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृर्तांी संख्या २२५ वर जाऊन पोहोचली आहे. दिवसभरात १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ५०८० झाली आहे.

corona virus : रत्नागिरीत कोरोनाचे ६३ नवे रुग्ण, ५ रूग्णांचा मृत्यू
रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी ६३ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६८३२ झाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृर्तांी संख्या २२५ वर जाऊन पोहोचली आहे. दिवसभरात १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ५०८० झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खेड तालुक्यातील ४ रुग्ण, गुहागरमधील ३, रत्नागिरीतील ३०, लांजातील १६ रुग्ण आणि गुहागर, चिपळूणमधील प्रत्येकी ५ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये अॅन्टीजेन टेस्टमधील ४० तर आरटीपीसीआर टेस्टमधील २३ रुग्ण आहेत.
दिवसभरात ५ कारोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, रूग्णाया तुलनेत मृत्यूचे प्रमाण आता ३.२९ टक्के झाले आहे. या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ७३ वर्षीय महिला, ४८ वर्षीय प्रौढ, गुहागर तालुक्यातील ६० व ७० वर्षांचे पुरुष रुग्ण आणि संगमेश्वरातील ७० वर्षीय वृध्दाचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले असून, ते ७४.३५ टक्के झाले आहे. आतापर्यंत ३९ हजार ४३२ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, त्यापैकी ३२ हजार ५८८ स्वॅब निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ५८८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.