corona virus : चिपळुणातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 03:15 PM2020-10-16T15:15:12+5:302020-10-16T15:18:10+5:30

corona virus, ratnagirinews, कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने जेवढे प्रयत्न केले, तेवढाच प्रयत्न त्या-त्या गावच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही केले. त्यामुळे तालुक्यातील १६५पैकी ११७ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी अजूनही ४८ गावांनी कोरोनाला गावात प्रवेश दिलेला नाही. यामध्ये विशेषत: रामपूर व वहाळ हद्दीतील गावांना मोठे यश आले आहे.

corona virus: 48 villages in Chiplun blocked corona at the gate | corona virus : चिपळुणातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले

corona virus : चिपळुणातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले

Next
ठळक मुद्देचिपळुणातील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखलेरामपूर व वहाळ हद्दीतील गावांना मोठे यश

संदीप बांद्रे 

चिपळूण : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने जेवढे प्रयत्न केले, तेवढाच प्रयत्न त्या-त्या गावच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही केले. त्यामुळे तालुक्यातील १६५पैकी ११७ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी अजूनही ४८ गावांनी कोरोनाला गावात प्रवेश दिलेला नाही. यामध्ये विशेषत: रामपूर व वहाळ हद्दीतील गावांना मोठे यश आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लागू झालेल्या संचारबंदीनंतर आजतागायत प्रशासन ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे. तूर्तास तालुक्यात २,२३५ इतके कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यामध्ये शहरी भागात ८९६, तर ग्रामीण भागात १,३३९ इतके रुग्ण आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण संख्या अजूनही नियंत्रणात आहे. यामध्ये तालुक्यातील रामपूर, अडरे, कापरे, दादर, खरवते, वहाळ, सावर्डे, फुरुस, शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील ४८ गावांनी कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखले आहे. यामध्ये रामपूर हद्दीतील १०, वहाळ हद्दीतील ११, तर खरवते हद्दीतील ७ गावांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही.

रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २६ गावे असून, त्यातील १७ गावांमध्ये रुग्ण आढळले. परंतु मजरेकौंढर, शिरवली, डुगवे, कळमुंडी, बोरगाव, चिवेली, उभळे, आंबेरे आदी १०गावांमध्ये, तर वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९ गावांपैकी ८ गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. मात्र, सर्वात जास्त ११ गावांचा अहवाल निरंक आहे.

यामध्ये केरे, कातळवाडी, पातेपिलवली, ढाकमोली, खांडोत्री, पिलवली, तोंडली, वारेली, देवपाठ, वडेरू आदी गावांचा समावेश आहे. तसेच अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील १७ गावांपैकी १५ गावांमध्ये रुग्ण आढळले असून, निरबाडे, मांडवखेरी ही दोन गावं निरंक आहेत.

दादर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० गावांपैकी १४ गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. तर रिक्टोली, कादवड, स्वयंदेव, गणेशपूर, राधानगर, दादर गावांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९ गावांपैकी १२ गावांमध्ये रुग्ण आढळले. ताम्हणमळा, ओमळी - पावरवाडी, खरवते, रावळगाव, रेहळे, खोपड, मजरेकाशी या गावात एकही रुग्ण आढळलेला नाही.

सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील २० गावांपैकी तब्बल १८गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. केवळ टेरव दत्तवाडी व वेतकोंड येथे रुग्ण आढळलेला नाही. फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १७ गावांपैकी १० गावांमध्ये रुग्ण आढळले असून, हडकणी, डेरवण खुर्द, मंजुत्री, गोवळ, पाते, तळवडे, नांदगाव खुर्द या गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील ११ गावांपैकी १० गावांमध्ये रुग्ण आढळले. केवळ कोंडफणसवणे गावात रुग्ण आढळलेला नाही.बिवली व कालुस्ते गावात सुरुवातीपासूनच जनजागृती केली गेली.

ग्राम कृती दलाने वाडीनिहाय काम केले. कोणी पाहुणा गावात आला तरी त्याची चौकशी करून होमक्वारंटाईन केले जात होते. शिवाय बिवलीचे सरपंच अनंत शिंदे व कालुस्तेचे रामकृष्ण कदम यांनी व सदस्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यासाठी गावातील खासगी डॉक्टरांची मदत घेतली. आयुर्वेदिक काढा व गोळ्या वाटप केले. ग्रामस्थांनी सर्व नियमांचे पालन केले.
- पराग बांद्रे,
बिवली, ग्रामसेवक

Web Title: corona virus: 48 villages in Chiplun blocked corona at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.