corona in ratnagiri: The number of home quarantine in the district is 70,000 | corona in ratnagiri : जिल्हयात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ७० हजारांच्या घरात

corona in ratnagiri : जिल्हयात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ७० हजारांच्या घरात

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हयात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ७० हजारांच्या घरात संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 193

रत्नागिरी  : दिवसेंदिवस जिल्ह्यात येण्यासाठी चाकरमान्यांची झुंबड उडत आहे. त्यामुळे क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्हयात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ७० हजारांच्या जवळपास पोहचली आहे. 

शनिवारपर्यंत होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ६९ हजार ७९९ वर पोहचली असून संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या १९३ आहे. 

संस्थात्मक क्वारंटाईन असणाऱ्यांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ३७, उपजिल्हा रुग्णालय कामथे, उपजिल्हा रुग्णालय कळबणी २३, ग्रामीण रुग्णालय दापोली ४, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर १,तहसिलदार दापोली ५, तहसिलदार, खेड ४९, तहसिलदार रत्नागिरी २८, तहसिलदार गुहागर १२, तहसिलदार राजापूर २५ असे मिळून एकूण १९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

Web Title: corona in ratnagiri: The number of home quarantine in the district is 70,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.