जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३७२ रुग्ण, १२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST2021-05-23T04:31:21+5:302021-05-23T04:31:21+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३७२ रुग्ण आढळले असून, त्यामध्ये शनिवारचे केवळ १५९ रुग्ण असून, उर्वरित २१३ रुग्ण मागील ...

Corona positive 372 patients, 12 deaths in the district | जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३७२ रुग्ण, १२ मृत्यू

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३७२ रुग्ण, १२ मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३७२ रुग्ण आढळले असून, त्यामध्ये शनिवारचे केवळ १५९ रुग्ण असून, उर्वरित २१३ रुग्ण मागील आहेत. कोरोनाबाधित एकूण रुग्ण ३२,४४४ झाले आहेत. कोरोनाने १२ जणांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या १,०४६ झाली आहे.

आरोग्य विभागाने १,७२८ जणांची तपासणी केली असता त्यापैकी १,३५६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील १४७ तर अँटिजन चाचणीतील २२५ रुग्ण आहेत. सलग तिसऱ्या दिवशी खेड आणि मंडणगड तालुक्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात ९४ रुग्ण, दापोलीत ४, गुहागरात ७, चिपळूणात ३३, संगमेश्वरमध्ये ८, लांजात ३ आणि राजापूरमधील १० रुग्णांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १७.३१ टक्के आहे.

शनिवारी मृतांचा आकडा कमी झाला असून, १२ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये रत्नागिरीत सर्वाधिक ६ रुग्ण, राजापुरात ३, चिपळुणात २ आणि लांजातील एकाचा मृताचा समावेश आहे. मृतांमध्ये ११ पुरुष रुग्ण असून, केवळ एक महिला आहे. यामध्ये चाळीशीतील २ रुग्ण मयत झाले आहेत. पॉझिटिव्ह मृत्यूचे प्रमाण ३.२२ टक्के आहे.

Web Title: Corona positive 372 patients, 12 deaths in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.