राजापुरातील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, नवे ७८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST2021-04-02T04:33:39+5:302021-04-02T04:33:39+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनामुळे राजापूर तालुक्यातील एका ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या ३७७ झाली ...

Corona kills old woman in Rajapur, 78 new patients | राजापुरातील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, नवे ७८ रुग्ण

राजापुरातील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, नवे ७८ रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनामुळे राजापूर तालुक्यातील एका ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या ३७७ झाली आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ७८ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११,१०७ झाली आहे. ४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत एकूण १०,१५० रुग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोना तपासणीची संख्या वाढवली आहे. गुरुवारी ४८३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४०५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील ६४ रुग्ण तर ॲन्टिजेन तपासणीतील १४ रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त २० रुग्ण आढळले तर दापोली तालुक्यात १२, खेडमध्ये ५, चिपळूणमध्ये १६, संगमेश्वरात ११, मंडणगडमध्ये ७, लांजा १ आणि गुहागर, राजापुरातील प्रत्येकी ३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात गृह अलगीकरणात ३०८ रुग्ण असून, वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ४९९ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३८ टक्के असून, मृत्यूचे प्रमाण ३.३९ टक्के आहे.

Web Title: Corona kills old woman in Rajapur, 78 new patients