शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Coronavirus Unlock- कोरोनाला रोखण्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर हिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 6:25 PM

CoronaVirus, Ratnagirinews कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांनी जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. एका सप्टेंबर महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्ण सापडले असण्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये एक हजार आणि नोव्हेंबरमध्ये तर ३६० नवे रूग्ण सापडले आहेत. ही संख्या घटत असल्याने आता आरोग्य यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाला रोखण्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर हिटमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचाही हातभार

मनोज मुळ्येरत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांनी जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. एका सप्टेंबर महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्ण सापडले असण्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये एक हजार आणि नोव्हेंबरमध्ये तर ३६० नवे रूग्ण सापडले आहेत. ही संख्या घटत असल्याने आता आरोग्य यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि जिल्हा हादरून गेला. सुरुवातीला एक नवीन रूग्ण सापडण्याने धास्ती वाढत होती, तिथे नंतर नंतर रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत गेली.सुरुवातीला तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाला उपस्थित लोक कोरोनाबाधित असल्याचे सापडले. त्यानंतर मुंबईत वाढणाऱ्या रुग्णांमुळे लाखो मुंबईकर रत्नागिरी जिल्ह्यात परत आले. तेव्हापासून रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढतच गेले. गणेशोत्सव काळात ही संख्या अधिकच जोमाने वाढली. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढले.सुदैवाने ऑक्टोबर महिन्यापासून हे प्रमाण घटू लागले. १९ ऑक्टोबरपासून नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट होत गेली. नोव्हेंबर महिन्यात तर हे प्रमाण अधिकच कमी आले आहे.महिनानिहाय सापडलेले रुग्ण- मार्च - ०१, एप्रिल - ०५, मे - २६४, जून - ३४४, जुलै - १२१२, ऑगस्ट - २०१६, सप्टेंबर - ३४७६, ऑक्टोबर - १०४१, नोव्हेंबर ३६०चाकरमानी आल्यानंतर..ज्या प्रमाणात चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात येऊ लागले, त्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे चाकरमानी गावी आले. पण त्यातील काहीजणांनी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली.रुग्णांचे वेळेवर निदानरत्नागिरीत कोरोना टेस्ट लॅब सुरू झाल्यानंतर रुग्णांचे निदान होण्याची वेळ अधिक कमी झाली. त्याआधी स्वॅब तपासणी मिरज, कोल्हापूर येथे केली जात होती. निदान वेळेवर झाल्याने आजार पसरण्याआधी रूग्णांवर उपचार सुरू झाले. आसपासच्या लोकांवरही वेळेवर उपचार झाले.माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचाही हातभारराज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम दोन टप्प्यात राबवली. आरोग्य खात्याने प्रत्येक कुटुंबाची तपासणी केली. जे लोक लक्षणे नाहीत, म्हणून तपासणीसाठी गेले नव्हते, जे लोक आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून तपासणीपासून वंचित होते, अशा सर्व लोकांची तपासणी झाली. कोरोनाला रोखण्यामध्ये त्याचाही हातभार खूप मोठा होता. त्यामुळे तळागाळातील लोकांमध्ये चांगल्या प्रमाणात जागृतीही झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक