लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड-बोरथडे फाटा येथे मालवाहू कंटेनर महामार्गाच्या मध्यभागी उलटल्याने महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. काही वेळाने वाहनचालकांनी एकेरी वाहतूक सुरू केली होती. हा अपघात शनिवारी रात्री झाला.मुंबईहून गोवाच्या दिशेने खत घेऊन कंटेनर (क्र. एमएच ९ ईएम ३३३७) निघाला होता. हा कंटेनर वाकेड-बोरथडे फाटा येथे आला असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर महामार्गाच्या मध्यभागी उलटला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. या अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.मात्र, महामार्गावरून हा कंटेनर बाजूला न केल्याने शनिवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत अशी तेरा तास एकेरी पद्धतीने वाहतूक सुरू होती. कलंडलेल्या कंटेनरमधील साहित्य बाजूला केल्यानंतर दुपारी क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
Ratnagiri: महामार्गावर कंटेनर उलटून अपघात; तेरा तास एकेरी वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:16 IST