शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जीपमधून रोड शो, अन् गाडी मालकाला ५ हजाराचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 12:05 IST

फुलांनी सजविलेल्या ओपन जीपमधून प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला रोड शो

रत्नागिरी : काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी रत्नागिरीकरांना ज्या गाडीतून अभिवादन केले त्या गाडीला नंबर प्लेटच लावण्यात आली नसल्याची बाब समाेर आली आहे. तर या गाडीची कागदपत्रेही नव्हती. याची दखल घेत पाेलिसांनी गाडी मालकाला ५,८०० रुपयांचा दंड ठाेठावला आहे.काॅंग्रेस ओबीसी सेलच्या मेळाव्यासाठी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले शुक्रवारी रत्नागिरीत आले हाेते. काॅंग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयाेजित करण्यात आला हाेता. या मेळाव्यानंतर भाजप सरकारविराेधात माेर्चाचे आयाेजन करण्यात आले हाेते. काॅंग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा माेर्चा काढण्यात येणार हाेता.मात्र, काॅंग्रेसची नेतेमंडळी रत्नागिरीत उशिराने दाखल झाल्याने हा माेर्चा रद्द करण्यात आला. त्यामुळे काॅंग्रेस भवन येथील मेळाव्यासाठी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथून ओपन जीपमधून जाण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी घेतला.फुलांनी सजविलेली गाडी विश्रामगृहाबाहेर तैनात करण्यात आली हाेती. या गाडीत प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष भानुदास माळी, माजी खासदार हुसेन दलवाई यांच्यासह अन्य मंडळी हाेती. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष अविनाश लाडही या गाडीत हाेते. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथून ते ओपन जीपमधून काॅंग्रेस भवनपर्यंत रत्नागिरीकरांना अभिवादन करत नाना पटाेले गेले.मात्र, ज्या गाडीत ते उभे हाेते त्या गाडीला नंबर प्लेटच लावण्यात आलेली नाही ही बाब पाेलिसांच्या नजरेतून सुटली नाही. ही गाडी पाेलिसांनी ताब्यात घेऊन संबंधिताची चाैकशी केली. त्यावेळी वाहनांची आवश्यक कागदपत्रेही नसल्याचे समाेर आले. माेटार वाहन कायद्याचा भंग केल्याचे लक्षात येताच पाेलिसांनी गाडी मालकाला ५ हजार ८०० रुपयांचा दंड ठाेठावला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस