शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधवांचे काँग्रेसविरोधात वक्तव्य, काँग्रेस नेत्याने दिला इशारा; म्हणाले..

By संदीप बांद्रे | Updated: November 13, 2024 17:39 IST

आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या खेर्डी येथील जाहीर सभेतील वक्तव्याचा घेतला समाचार 

चिपळूण : महाविकास आघाडीची रचना त्रिदेवाप्रमाणे करण्यात आली आहे. या तीन भावडांप्रमाणे एकत्रित राहून विधानसभा निवडणूकीला सामोरे जायचे ठरले आहे. त्यात लहान मोठा कोणी असला तरी त्यात एकमेकांना साभांळून घेण्याची गरज असताना काँग्रेस संपली असे म्हटले जात असेल तर तुम्ही मित्रपक्ष कसले. कालच्या बैठकीला आपण उपस्थित असतो, तर हे आरोप सहन केले नसते. तेथेच त्याची प्रतिक्रिया उमटली असती. काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना काँग्रेस काय आहे हे विधानसभाच नव्हे, तर आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही पहायला मिळेल, असा इशारा काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी आढावा बैठकीत दिला. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराबाबत आढावा घेण्यासाठी काँग्रेसची स्वतंत्र बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बेटकर यांनी उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव न घेता त्यांच्या खेर्डी येथील जाहीर सभेतील वक्तव्याचा रोजदार समाचार घेतला. बेटकर म्हणाले की, महाविकास आघाडी एकदिलाने विधानसभा निवडणुकीचे कामकाज करीत आहेत. प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता झटून काम करत आहे. असे असताना काँग्रेसचे अस्तित्व काय, काँग्रेस संपली अशा वल्गना मित्र पक्षाकडून केल्या जात असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. अन् तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बेटकर यांनी सुनावले. यावेळी तालुकाध्यक्ष लियाकत शाह, संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ता पारकर, तालुका उपाध्यक्ष संजय जाधव, रफीक मोडक, सेवादल जिल्हाध्यक्ष टी डी पवार, यशवंत  फके, महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, संगमेश्वर महिला तालुकाध्यक्षा मिताली कडवइकर, चिपळूण तालुकाध्यक्ष निर्मला जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chiplun-acचिपळूणcongressकाँग्रेसBhaskar Jadhavभास्कर जाधवMahavikas Aghadiमहाविकास आघाडीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024