शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा समस्येवर कंपोस्टिंगचा उतारा,  रत्नागिरी नगर परिषदेचा उपक्रम, स्वच्छ सर्वेक्षणद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 16:49 IST

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भागात कंपोस्टिंग केले जाणार आहे.

ठळक मुद्दे १६ उद्यानांमध्ये कंपोस्टिंग, आधी कचराकुंडी आता त्या जागी रांगोळीस्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला, सुका कचरा असे वर्गीकरणरत्नागिरी शहर स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भागात कंपोस्टिंग केले जाणार आहे.

शहरातील ३६पैकी १६ उद्यानांमध्ये ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करण्याचे छोटे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नगर परिषदेच्या या प्रयत्नांमुळे कचऱ्याची समस्या अंशत: सोडविण्यात रत्नागिरी नगर परिषदेला यश आले आहे.गेल्या महिनाभरापासून शहरात स्वच्छ सर्वेक्षण ही शासनाची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहर स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेनुसार शहरातील सर्व ३० वॉर्डमध्ये टप्प्याटप्प्याने हे सर्वेक्षण सुरू होणार आहे.

जून २०१८पर्यंत ही सर्वेक्षण योजना सुरू राहणार असून, त्याद्वारे शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन कसे करावे, संकलन कसे करावे, याबाबतची घडी बसवली जाणार आहे. सध्या ७, ८, १४ व अन्य काही वॉर्डमध्ये स्वच्छ सर्वेक्षण योजनेनुसार घंटागाड्यांवर ओला व सुका कचरा असे नागरिकांकडूनच वर्गीकरण केलेला कचरा स्वीकारला जात आहे.आतापर्यंत ज्या वॉर्डमध्ये स्वच्छ सर्वेक्षण योजना राबवली आहे त्यानुसार तेथील ७० टक्के नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून व्यवस्थितरित्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर देण्यास सुरूवात केली आहे. या योजनेचे रत्नागिरी शहराचे काम कार्पे या पुण्यातील एजन्सीकडे देण्यात आले असून, त्यांचे ३० कर्मचारी ही योजना योग्यरित्या राबविण्यासाठी शहरात कार्यरत आहेत.रत्नागिरी शहरात २०१७मध्ये भाजपचे तत्कालिन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी नगर परिषदेजवळील मोकळ्या जागेत ओल्या कचऱ्याचे कंंपोस्ट खत बनविण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर आता शहरातील ३६पैकी १६ उद्यानांमध्ये नगर परिषदेतर्फे ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी कंपोस्ट खताचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

हे प्रकल्प छोटे असले तरी ओल्या कचऱ्यांबाबतची समस्या तरी काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे. कचऱ्याची समस्या सोडविणे व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेतर्फे स्वच्छता अ‍ॅपही देण्यात आले असून, ते सुमारे २२०० नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. त्यावर आलेल्या १६५ तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे.कचराकुंड्या उचलण्यात आल्यानंतर त्या कुंड्यांच्या जागी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. त्यामुळे अशा ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये, यासाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले. त्यानंतर कचरा टाकण्याचे प्रमाण घटले. अशा जागेवर कचरा टाकणे पूर्णत: बंद व्हावे, यासाठी आता त्या जागांवर नगर परिषदेतर्फे रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे कचरा टाकणे बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान