Satara: Students participate in clean, beautiful Satara campaign; | सातारा : स्वच्छ, सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रभात फेरीत नगराध्यक्षांसह पदाधिकारीही सहभागी

ठळक मुद्देस्वच्छ व सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग मुख्य रस्त्यावरुन जनजागृती रॅली स्वच्छता अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी शिक्षकांची कार्यशाळा

सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मोहिमेत सहभागी झालेला सातारा नगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ व सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवत मंगळवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीत नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, आरोग्य सभापती वसंत लेवे, नगरसेवक विशाल जाधव, स्मीता घाडगे यांच्यासह पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, पालिका शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.

सातारा नगरपालिकेने यापूर्वीच स्वच्छ व सुंदर साताराचे स्वप्न पाहिले आहे. त्यातच स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभाग घेतल्याने साताऱ्यात ही चळवळ गतीमान झाली आहे. ठिकठिकाणी काही ना काही उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता अ‍ॅपच्या जनजागृती व सहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांची कार्यशाळाही काही दिवसांपूर्वी घेण्यात आली होती.

राजवाडा येथील गांधी मैदानापासून सुरू झालेली ही रॅली मोती चौक, पाचशे एक पाटी चौक, शेटे चौक, पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाक्यावर पोहोचली.