शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील उड्डाण पुलाच्या पिलरचे गर्डर तोडण्यास सुरुवात, जुन्या कामाचा पूर्ण खर्च गेला वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 12:20 IST

१६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळला होता

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरीलचिपळुणातील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. उलट आधी उभारलेल्या पिलरवरील गर्डरच तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत या पुलावर केलेला निम्म्याहून अधिक खर्च वाया गेल्यासारखाच आहे. पुलाच्या नव्या रचनेनुसार गर्डर तोडल्यानंतर दर २० मीटरवर पिलर उभारून मगच उड्डाणपुलाची रचना केली जाणार आहे. त्यामुळे हे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १,८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून, हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून, बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू झाले होते. मात्र, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळला.या दुर्घटनेला नऊ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे अतिरिक्त गर्डर पिलर उभारण्याचे काम सुरू असले तरी या उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप अपेक्षित गती आलेली नाही. त्यामुळे हे काम कधी पूर्णत्वास जाणार, असा प्रश्न केला जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या आराखड्यामध्ये बदल सुचवले होते. यामध्ये सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले आहेत. त्यामधील अंतर कमी करून ते २० मीटरवर ठेवले जाणार आहेत तसेच तेथे अतिरिक्त पिलर उभारले जाणार आहेत. - आर. बी. कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणhighwayमहामार्ग