शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषी महाविद्यालय, फणस संशोधन केंद्राच्या प्रस्तावांना लवकर मान्यता; उदय सामंत यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:51 IST

कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी देणार

लांजा : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाली असून, कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रांचा प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करून दिले जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी सिंधुरत्न योजनेमधून कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.गवाणे (ता. लांजा) येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कुलगुरू डाॅ. संजय भावे, संचालक डाॅ. प्रमोद सावंत, डाॅ. प्रशांत बोडके, डाॅ. प्रकाश शिनगारे, तहसीलदार प्रमाेद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सरपंच भीमराज कांबळे उपस्थित होते.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राच्या जमिनीचा उपयोग शेतकऱ्यांसाठीच झाला पाहिजे. आधुनिक युगात अत्याधुनिक सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या केंद्राचा उद्देश आहे. रेशीम उद्योगाबाबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल. महिला, युवकांना या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. यावेळी कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा देण्याची जबाबदारी माझी आहे, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. भावे म्हणाले की, आजचा शेतकरी हा अभ्यासू असून, बांबू उद्याेगावर काम होणे आवश्यक आहे. १० हेक्टर जागा बांबूसाठी वापरली तर आयात करायची आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक डॉ. प्रमाेद सावंत यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. आनंद हनमंते यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.नावाप्रमाणे चांगले काम कराकोकण कृषी विद्यापीठाने नावाप्रमाणे चांगले काम करावे. संशोधनात्मक काम करून शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी. त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना कर्जमुक्त बनवावे. कोकण कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. त्याच मायेने शेतकऱ्यांना लाभ मिळावेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.विद्यापीठाला ‘डाेस’आपल्या विद्यापीठाचे नाव मोठे आहे. तुमच्याकडे आलेला विद्यार्थी चांगला शास्त्रज्ञ, शेतकरी बनू शकतो, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. नाव चांगले आहे म्हणून नावासाठी विद्यार्थी येतात. प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला काहीच मिळत नाही म्हणून दुसऱ्या विद्यापीठाचे मार्ग स्वीकारतात असे हाेणार नाही याची काळजी घ्या, असे सामंत म्हणाले.दापोली, लांजात रेडिओ कम्युनिटी सेंटरसध्याच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा, काजूसह भात, नाचणी, आदी विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या बदलत्या वातावरणाची माहिती शेतकऱ्यांना अगोदरच मिळावी या दृष्टीने रेडिओ कम्युनिटी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. लांजा आणि दापोली कृषी विद्यापीठात हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत