जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी घेतले श्री भैरीबुवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:15+5:302021-07-20T04:22:15+5:30

रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिराला नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी भेट देऊन श्री भैरीबुवाचे ...

Collector Dr. Patil visited Shri Bhairibuwa | जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी घेतले श्री भैरीबुवाचे दर्शन

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी घेतले श्री भैरीबुवाचे दर्शन

रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिराला नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी भेट देऊन श्री भैरीबुवाचे दर्शन घेतले.

श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाचे समूळ निर्मूलन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यासाठी स्वत:चा असा एक ठोस कृती आराखडा तयार केला असून, त्यांच्या कार्यात श्री भैरीचा आशीर्वाद लाभो, महिनाभरात जिल्ह्यातील कोरोना नष्ट होवो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, विकास मयेकर, जितेंद्र भोंगले, मनू गुरव, प्रकाश घुडे, चंद्रकांत गावखडकर, विजय खेडेकर, राजन पगरे, मुन्ना विलणकर, अमित विलणकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Collector Dr. Patil visited Shri Bhairibuwa