रत्नागिरी जिल्हा बँकेत सहकार पॅनेलचेच वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 12:05 IST2021-11-21T10:58:00+5:302021-11-21T12:05:58+5:30
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातपैकी पाच जागा सर्वपक्षीय सहकार पॅनेलला मिळाल्या. आधीच्या बिनविरोध जागा लक्षात ...

रत्नागिरी जिल्हा बँकेत सहकार पॅनेलचेच वर्चस्व
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातपैकी पाच जागा सर्वपक्षीय सहकार पॅनेलला मिळाल्या. आधीच्या बिनविरोध जागा लक्षात घेता सहकार पॅनेलने २१ पैकी १९ जागा जिंकून बँकेवरील वर्चस्व कायम ठेवले आहे.
पहिल्या तासाभरात रत्नागिरी, गुहागर आणि लांजा या तीन तालुका मतदार संघातील मतमोजणी झाली. रत्नागिरीत सहकार पॅनेलचे गजानन पाटील आणि गुहागरमधील सहकार पॅनेलचे डॉ. अनिल जोशी विजयी झाले. लांजा मतदार संघात सहकार पॅनेलचा पराभव झाला. तेथे विरोधी उमेदवार महेश खामकर विजयी झाले.
जिल्हानिहाय मतदार संघाच्या चारपैकी तीन जागा सहकार पॅनेलने जिंकल्या. यात पॅनेलचे दिनकर मोहिते, संजय रेडीज आणि सुरेश कांबळे विजयी झाले. यातील एक जागा विरोधी गटाच्या अजित यशवंतराव यांनी जिंकली.