शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: यंदा पावसाळ्यात गारवा नाही; उकाडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:52 IST

बंगालच्या उपसागरात जून महिन्यात कमी दाबाचे पट्टे निर्माण न झाल्याने विचित्र अनुभव

रत्नागिरी : पावसाळ्याचा दीड महिना संपत आला तरी अजून पावसाने म्हणावा तसा जोर घेतलेला नाही. वातावरणातील बदलामुळे पावसाचा लहरीपणा वाढला आहे. जून महिन्यात बंगालच्या उपसागरात दर १० ते १२ दिवसांनी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. यंदा ते झालेच नसल्याने पावसाचे आगमन अजूनही लांबलेलेच आहे. दरम्यान, पावसाची विश्रांती आणि वाढलेली आर्द्रता यामुळे यंदा पावसाळ्यात गारवा गायब; पण उकाडा कमालीचा वाढला आहे.जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. त्यापैकी जून आणि जुलै या दोन महिन्यांत पाऊस मुसळधार पडतो. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धापासून पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. जिल्ह्यात साधारणत: या चार महिन्यांत ३३६४ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यापैकी जून महिन्यात ८१८ आणि जुलै महिन्यात १२४६ मिलिमीटर म्हणजे साधारणत: २००० मिलिमीटर पाऊस या दोन महिन्यांत पडतो.यंदा जून महिन्याची आकडेवारीही पावसाने ओलांडलेली नाही. जुलै महिन्याचेही दहा दिवस संपले तरीही केवळ हलक्या सरीच पडत आहेत. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्यासारखे वाटत आहे.सध्या कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस आहे. आर्द्रता ७८ ते ८३ टक्के वाढल्याने घामाच्या धारांसह उकाड्याने हैराण केले आहे. कोकणात साधारणत: १० ते १२ जूननंतर नियमित होणारा पाऊस अगदी जुलै महिन्यापर्यंत संततधारेने अधूनमधून कोसळत असतो. मात्र, यंदा निम्मा जुलै महिना संपत आला तरीही पाऊस नियमित होण्याची चिन्हे दिसत नाहीत.हवामान खात्याचे अंदाजही पाऊस जुमानेसा झाला आहे. १२ रोजी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा, तसेच १३ आणि १४ रेाजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.