खेड शहरात राष्ट्रवादीतर्फे स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST2021-07-31T04:32:21+5:302021-07-31T04:32:21+5:30

दस्तुरी : महापुरामध्ये खेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व हुतात्मा अनंत कान्हेरे स्मारक परिसर चिखलाने माखलेला आहे. ...

Cleaning campaign by NCP in Khed city | खेड शहरात राष्ट्रवादीतर्फे स्वच्छता मोहीम

खेड शहरात राष्ट्रवादीतर्फे स्वच्छता मोहीम

दस्तुरी : महापुरामध्ये खेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर व हुतात्मा अनंत कान्हेरे स्मारक परिसर चिखलाने माखलेला आहे. तसेच खेड बाजारपेठेतही चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात खेड शहर व युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वच्छता माेहीम राबविण्यात आली.

माजी आमदार संजय कदम, शहराध्यक्ष सतीश चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कार्यकर्ते ही मोहीम राबवत आहेत. शहरातील आंबेडकर पुतळ्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व अजय बिरवटकर, ठाणे येथील नगरसेवक अरविंद मोरे, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, युवक तालुकाध्यक्ष ॲड. अश्विन भोसले, नगरसेवक अजय माने, नगरसेवक राजू संसारे, नगरसेवक तौसिफ खोत, नगरसेवक इलियाज खतीब, नगरसेविका जयमाला पाटणे, सुनील साळुंखे, मंडणगड पंचायत समितीचे सदस्य नितीन म्हामुणकर, युवराज जाधव, युवती शहराध्यक्ष ॲड. पूजा तलाठी, शुभम जाधव, उमेश देवरुखकर, किशोर साळवी, दीपक मोरे, जगदीश पाटणे व ठाणे येथील युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

-----------------------------------

खेड शहरातील जिजामाता उद्यानातील पुतळा परिसराची माजी आमदार संजय कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली.

Web Title: Cleaning campaign by NCP in Khed city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.