Chiplun's Shubham Shinde selected for Indian team | चिपळूणच्या शुभम शिंदेंची भारतीय संघात निवड

चिपळूणच्या शुभम शिंदेंची भारतीय संघात निवड

ठळक मुद्देचिपळूणच्या शुभम शिंदेंची भारतीय संघात निवड शुभमसोबतच पंकज मोहितेचीही निवड

अडरे (चिपळूण) : अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये एकहाती विजय मिळवून देणारा चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील वाघजाई क्रीडा मंडळाचा खेळाडू शुभम शिंदे याची भारताच्या प्राथमिक कबड्डी संघात निवड झाली आहे.

गत वर्षी चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत शुभमने केलेल्या बहरदार खेळामुळे रत्नागिरी संघाने अजिंक्य पद प्राप्त केले होते. त्यानंतर राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शुभमने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.

महाराष्ट्राच्या कबड्डी संघाकडून खेळताना अनेक वेळा चमकदार कामगिरी करुन स्वत:ला सिद्ध केले होते. त्यामुळे आता त्याची भारताच्या प्राथमिक कबडड्डी संघात निवड करण्यात आली आहे. महाराट्रातून शुभमसोबतच पंकज मोहिते या खेळाडूचीही निवड झाली आहे.

या निवडीबदद्दल आमदार शेखर निकम, शिवसेना तालुकाप्रमुख चिपळूण प्रताप शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम कबड्डी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष मंगेश उर्फ बाबू तांबे ,दसपटी क्रीडा मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख मुंबई प्रदीप कदम यांनी शुभमचे अभिनंदन केले.

Web Title: Chiplun's Shubham Shinde selected for Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.