जुळ्यांच्या गंमतीशीर विश्वात चिपळूणकर रमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:02 PM2020-02-03T12:02:16+5:302020-02-03T12:05:17+5:30

हे दोघेही एकाच वर्गात शिकले. त्यामुळे शाळेत नेहमी त्यांना करण-अर्जुन या नावानेच संबोधले जायचे. मात्र, त्यातील करण कोण व अर्जुन कोण, हा फरक ओळखता येत नसे. त्यांच्यात इतके साम्य आहे की, मोबाईलवर फोटो ओळखपत्र देतानादेखील दोघांचा चेहरा एकमेकांना लागू होतो.

Chiplunkar was engrossed in the fun world of twins | जुळ्यांच्या गंमतीशीर विश्वात चिपळूणकर रमले

जुळ्यांच्या गंमतीशीर विश्वात चिपळूणकर रमले

googlenewsNext
ठळक मुद्दे- चिपळुणात जुळ्यांचे संमेलन- मातृत्वाला गिफ्ट मिळाल्याची अनेक पालकांची भावना - अचंबित करणाऱ्या गोष्टी

चिपळूण : कधी सावळा आणि गोरा रंग, कधी उंचीतील फरक तर कधी दोघांमधील तंतोतंत असलेले साम्य चिपळूणवासियांना रविवारी जुळ्यांच्या संमेलनात अनुभवायास मिळाले. एवढेच नव्हे तर त्यांच्या जीवनातील गंमतीशीर घटना, प्रसंग व त्यांच्या अनोख्या स्वभावाविषयी अनेकांना कुतुहल वाटले.

चिपळूण रोटरी क्लबतर्फे प्रथमच अशा पध्दतीचा उपक्रम चिपळुणात झाल्याने त्याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्याप्रमाणे ३०हून अधिक जुळ्यांनी या संमेलनात सहभाग घेतला. त्यातील करण-अर्जुन कांबळे यांच्या विश्वातील गंमतीशीर गोष्टीने अनेकजण अचंबित झाले. हे दोघेही एकाच वर्गात शिकले. त्यामुळे शाळेत नेहमी त्यांना करण-अर्जुन या नावानेच संबोधले जायचे. मात्र, त्यातील करण कोण व अर्जुन कोण, हा फरक ओळखता येत नसे. त्यांच्यात इतके साम्य आहे की, मोबाईलवर फोटो ओळखपत्र देतानादेखील दोघांचा चेहरा एकमेकांना लागू होतो.

तसेच रिध्दी-सिध्दी काटकर या दोन मुलींमधील साम्यदेखील चक्क आई-वडिलांना चकीत करुन सोडते. ह्यसीता और गीताह्ण या चित्रपटातील व्यक्तीरेखेप्रमाणे रिध्दी व सिध्दी यांच्यातदेखील कडक व मृदू स्वभाव हाच त्यांच्यात फरक असल्याचे आई-वडिलांनी सांगितले. याशिवाय जाई-जुई चिंगळे, आभास-अध्याय थरवळ, अजय-विजय जाडे, परेश-पंकज तांबट व ६३ वर्षांच्या चित्रा कानडे व स्नेहलता शेवडे यांच्यातील साम्य सर्वांनाच चकीत करणारे होते. चित्रा व स्नेहलता यांच्यात लाल व काळ्या टिकलीद्वारे फरक आढळून येतो. त्यावरुन लोक त्यांना ओळखतात.

तिळ्यांचे ठरले आकर्षण
या संमेलनात नंदन-विजय-भूषण भास्कर कदम हे तिळे सहभागी झाले होते. तिघांचे उच्चशिक्षण झाले असून, त्यांच्या सवयी व स्वभावातही तितकेच साम्य आहे. तिळे म्हणून अनेकजण त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत असतात.

Web Title: Chiplunkar was engrossed in the fun world of twins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.