शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील तरुणाला पोक्सो गुन्ह्यांतर्गत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:22 IST

Crime News RatnagiriNews- नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या मार्गताम्हाणे - पालशेतकरवाडी येथील तरुणाला वर्षभरानंतर पोलिसांनी मुंबईत सापळा रचून ताब्यात घेतले आहे. अटक करून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सुरेश पालशेतकर (३२, रा. मार्गताम्हाणे, पालशेतकरवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ठळक मुद्दे पोलिसांकडून वर्षभर शोध सुरू वर्षभरानंतर मुंबईत सापळा रचून संशयिताला केले जेरबंद

चिपळूण : नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या मार्गताम्हाणे - पालशेतकरवाडी येथील तरुणाला वर्षभरानंतर पोलिसांनी मुंबईत सापळा रचून ताब्यात घेतले आहे. अटक करून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सुरेश पालशेतकर (३२, रा. मार्गताम्हाणे, पालशेतकरवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.त्याने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीवर मार्च २०१९ मध्ये बलात्कार केला होता. त्यानुसार त्याच्यावर ३१ जुलै २०१९ रोजी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या घटनेनंतर वैभव पसार होता. गावात घर अथवा त्याचे नातेवाईक नसल्याने तपासात अडचण निर्माण झाली होती. त्याचे मित्र व ग्रामस्थांकडून कोणतीही माहिती मिळत नव्हती. पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतु, वर्षभरात त्याचा थांगपत्ता लागला नाही.कल्याण (मुंबई) परिसरातील एका रुग्णालयात वैभव नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या रुग्णालयात त्याचा पगार अडकला होता. त्यामुळे तो तेथे येणार असल्याची खात्री पटल्याने चिपळूण पोलिसांनी तेथेच तीन दिवस सापळा रचला. अखेर वैभव या रुग्णालयाच्या ठिकाणी येताच त्याला ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस नाईक आशिष भालेकर, पंकज पडेलकर, महिला पोलीस आदिती जाधव यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी