रामदास आठवले यांचा धावता चिपळूण दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST2021-05-21T04:33:43+5:302021-05-21T04:33:43+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी ...

Chiplun tour of Ramdas Athavale | रामदास आठवले यांचा धावता चिपळूण दौरा

रामदास आठवले यांचा धावता चिपळूण दौरा

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी चिपळूणचा धावता दौरा केला. खेड तालुका आरपीआय तालुकाध्यक्ष रजनीकांत गोपाळ जाधव यांच्या कुटुंबाचे चिपळूणजवळील धामणदेवी येथे जाऊन सांत्वन केले.

चिपळूणच्या सीमेवर असलेल्या धामणदेवी येथील रहिवासी असलेल्या ५४ वर्षीय जाधव यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. ते अनेक वर्षे आरपीआय युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करीत होते. वर्षभरापूर्वीच त्यांच्यावर आरपीआय खेड तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या निधनामुळे खासदार आठवले यांनी जाधव कुटुंबाची भेट घेत धीर दिला. यावेळी जाधव यांच्या पत्नी, भाऊ, पुतणे उपस्थित होते. यावेळी आठवले यांच्यासमवेत राजू जाधव, सुशांत सकपाळ, विकास धोत्रे, के.डी़ कदम, संग्राम जाधव, विश्वास जाधव, विकास जाधव, उमेश सकपाळ उपस्थित होते.

Web Title: Chiplun tour of Ramdas Athavale