चिपळूण लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST2021-07-14T04:36:46+5:302021-07-14T04:36:46+5:30
अडरे : आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या नियमावलीनुसार चिपळूण लायन्स क्लब सन २०२१-२२ साठी अध्यक्ष तुषार गोखले, सचिव जगदीश वाघुळदे, खजिनदार ...

चिपळूण लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा
अडरे : आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या नियमावलीनुसार चिपळूण लायन्स क्लब सन २०२१-२२ साठी अध्यक्ष तुषार गोखले, सचिव जगदीश वाघुळदे, खजिनदार नहुष चितळे यांची निवड करण्यात आली. यांचा शपथविधी समारंभ सोमवारी (दि. १२) कोविडचे नियम पाळून करण्यात आला.
यावेळी माननीय नितीन गांधी यांच्या हस्ते शपथविधी सोहळा पार पडला. झोन चेअरमन गिरीश कोकाटे, सावर्डे क्लब अध्यक्ष राजेशिर्के, गॅलॅक्सी क्लब अध्यक्ष रुमा देवळेकर, अक्षता रेळेकर, दापोली क्लबचे अध्यक्ष चेतन जैन, महेंद्र जैन, आशिष मेहता, चिपळूण अर्बन बँकेचे अप्पा खेडेकर, मिलिंद कापडी उपस्थित होते. मिलिंद मुद्राळे यांनी सूत्रसंचालन, तर श्रीनिवास परांजपे यांनी आभार मानले.
130721\img-20210713-wa0014.jpg
चिपळुण लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात