चिपळूणचे नगरसेवक भगवान बुरटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST2021-05-17T04:30:01+5:302021-05-17T04:30:01+5:30
चिपळूण : शहरातील गोवळकोटवासियांचे लाडके नेतृत्व व विद्यमान नगरसेवक भगवान कृष्णा बुरटे (५५) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन ...

चिपळूणचे नगरसेवक भगवान बुरटे यांचे निधन
चिपळूण : शहरातील गोवळकोटवासियांचे लाडके नेतृत्व व विद्यमान नगरसेवक भगवान कृष्णा बुरटे (५५) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गोवळकोट येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बांधकाम व्यावसायिक म्हणून अनेक वर्षे ते काम करीत होते. ते अनेक वर्षे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून राजकारणातही सक्रिय होते. नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी व त्यांच्या सहकारी नगरसेविका सुषमा कासेकर यांनी अनेक कामांना गती दिली व पूर्णत्त्वास नेली. त्यांच्या या कार्याला आता पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची ‘एक्झिट’ झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, भाऊ असा परिवार आहे.