शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: चिपळूणची जागा उद्धवसेनेने सोडली?, ‘मातोश्री’वरील बैठक अचानक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:18 IST

जागा कोणाच्या वाटेला?

रत्नागिरी : जिल्ह्यातील उद्धवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या ‘माताेश्री’वरील बैठकीत चिपळूण मतदारसंघाची बैठक अचानक रद्द करण्यात आल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चिपळूण दाैऱ्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साेडण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.जिल्ह्यात चिपळूण वगळता चारही आमदार शिवसेनेचे आहेत. मात्र, राजकीय स्थित्यंतरानंतर चिपळूणचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाेबत तर दापाेली, रत्नागिरीचे आमदार शिंदेसेनेसाेबत गेले आहेत. त्यामुळे सध्या उद्धवसेनेकडे दाेन आमदार आहेत. आगामी निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला देण्याचे महाविकास आघाडीने निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच जागांपैकी चिपळूण वगळता उर्वरित चार जागा उद्धवसेनेला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘माताेश्री’वर इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बाेलावली हाेती. या बैठकीत राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापाेली मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र, चिपळूणबाबतची बैठक अचानक रद्द करण्यात आली. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर चिपळूणची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साेडण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

रत्नागिरीबद्दल ‘वेट ॲण्ड वाॅच’बैठकीत विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात उद्धवसेनेचे प्राबल्य कसे राहील, यावर चर्चा करण्यात आली. पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी गतीने कामाला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र, रत्नागिरी मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराविषयी काेणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराबाबत अजूनही ‘वेट ॲण्ड वाॅच’ आहे.

गुहागरात काेण चालेल?गुहागर मतदारसंघाबाबत मिलिंद नार्वेकर व विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी भास्कर जाधव अथवा विक्रांत जाधव यांच्यापैकी तुम्हाला काेण चालेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पदाधिकाऱ्यांनी काेणी चालेल, असे सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChiplunचिपळुण