चिपळूण भाजप तालुकाध्यक्षांच्या गाडीला अपघात; सर्व जण सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST2021-04-09T04:34:12+5:302021-04-09T04:34:12+5:30
चिपळूण : भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या एर्टीगा कारला समोरून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीने धडक दिल्याने अपघात झाला. गुरुवारी दुपारी ...

चिपळूण भाजप तालुकाध्यक्षांच्या गाडीला अपघात; सर्व जण सुखरूप
चिपळूण : भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या एर्टीगा कारला समोरून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीने धडक दिल्याने अपघात झाला. गुरुवारी दुपारी १.३० वाजता गुहागर - चिपळूण मार्गावर मिरजोळी पेट्रोलपंपासमोर हा अपघात झाला. सुदैवाने एअरबॅगमुळे कोणालाही दुखापत झाली नाही. तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर या वेळी गाडीत नव्हते. मात्र, अपघात हाेताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांची एर्टीगा कार घेऊन त्यांचे नातेवाईक गुहागरच्या दिशेने निघाले होते. गुहागर - चिपळूण मार्गावर मिरजोळी पेट्रोलपंपासमोर आले असता समोरून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीने भोबस्कर यांच्या कारला समोरूनच जोरदार धडक दिली. धडक बसताच एर्टीगा गाडीच्या दोन्ही एअरबॅग बाहेर आल्या. त्यामुळे कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले. धडक देणारी स्कार्पिओ गाडी ही चिपळूणमधील असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप तालुकाध्यक्षांच्या गाडीला अपघात झाल्याचे चिपळूणमध्ये समजताच नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, नगरसेवक निशिकांत भोजन, आशिष खातू, परिमल भोसले अशा अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.