शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
3
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
4
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
5
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
6
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
7
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
8
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
9
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
10
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
11
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
12
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
13
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
14
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
15
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
16
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
17
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
18
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
19
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
20
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...

खेळता-खेळता बंदुकीतील छर्रा लागून बालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 16:23 IST

खेळता-खेळता एयरगन रोखून चाप ओढल्याने त्यातून सुटलेला छर्रा लागून यश सुधीर धांगडे (७, रा. कामथे, हुमणेवाडी) हा बालक जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली. त्याला उपचारासाठी कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देखेळता - खेळता बंदुकीतील छर्रा लागून बालक जखमीचिपळूण तालुक्यातील कामथे येथील घटना, कऱ्हाड येथे उपचार सुरू

चिपळूण : खेळता-खेळता एयरगन रोखून चाप ओढल्याने त्यातून सुटलेला छर्रा लागून यश सुधीर धांगडे (७, रा. कामथे, हुमणेवाडी) हा बालक जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली. त्याला उपचारासाठी कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे.याबाबत चिपळूण पोलीस स्थानकातून दिलेल्या माहितीनुसार यश हा आपल्या काही मित्रांसोबत घराच्या परसवात खेळत होता. त्यावेळी एका दहा वर्षीय मुलाने घरातून एयरगन आणली. छर्रा भरलेली एयरगन त्याने यशच्या समोर धरली आणि त्याने चाप ओढला. बंदुकीतून सुटलेला छर्रा सुसाट वेगाने यशच्या उजव्या बाजूच्या बरगडीमध्ये घुसला आणि तो खाली कोसळला. वेदनेने तो तडफडू लागला.यश जखमी झाल्याचे समजताच त्याचे मित्र घाबरले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला. घरातील माणसांनी धाव घेत यशला सर्वप्रथम चिपळूणच्या एका रुग्णालयात घेऊन गेले. नंतर त्याला कऱ्हाड येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करीत आहेत. याप्रकरणी अद्यापही कोणी तक्रार दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.बंदूक पोलिसांच्या ताब्यातही एयरगन सचिन शांताराम हुमणे यांच्या मालकीची आहे. त्यांनी शेतीच्या कामासाठी बंदुकीचा वापर करत असल्याचे पोलिसांना जबाबात सांगितले. ही एयरगन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी