शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

दापोलीतील बालिकेवर अत्याचार; जळगावातील वाहकाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 16:17 IST

घराच्या अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षीय बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवत घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या दापोली एसटी आगाराच्या वाहकाला जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधिश ए. एस. आवटे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

ठळक मुद्देबालिकेवर अत्याचार; जळगावातील वाहकाला जन्मठेपबालिकेला खाऊ देण्याचे आमिष

खेड : घराच्या अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षीय बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवत घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या दापोली एसटी आगाराच्या वाहकाला जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधिश ए. एस. आवटे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.दापोली शहरातील काळकाई कोंड येथील चाळीमध्ये ही घटना ५ जुलै २०१६ रोजी घडली होती. एस. टी. वाहक सुनिल महाजन (मूळ चहाळी ता. चोपडा, जि. जळगाव) हा दापोली बसस्थानकात वाहक म्हणून कार्यरत होता. तो दापोली काळकाई कोंड येथे भाड्याने खोली घेवून राहत होता. त्याच्याच शेजारी दापोली बसस्थानकात चालक म्हणून कार्यरत असलेल्या त्याच्याच सहकाऱ्याची अडीच वर्षीय चिमुरडी अंगणात अन्य लहान मुलांसमवेत खेळत होती.सुनिल याने बलिकेला खाऊचे आमिष दाखवत घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना खोलीसमोरच कपडे धुणाऱ्यां मुलीच्या आईने पाहिली व तात्काळ तिला दापोली जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात वाहक महाजन याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्याला अटक केली.

या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आरोपीला जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधिश ए. एस. आवटे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात चिमुरडीच्या आईवडीलांची साक्ष व वैद्यकिय अहवाल महत्वपूर्ण ठरले. सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयRatnagiriरत्नागिरी