शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् शिवसेना आमदार राजन साळवी गहिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 12:39 IST

Uddhav Thackeray Rajan Salvi ShivSena Ratnagiri: लगेच उद्धव ठाकरे यांचे पुढचे वाक्य होते. अरे मी काही नाही. तुझ्यासारखे शिवसैनिक हीच माझी ताकद, त्यामुळेच हे माझ्याकडून होत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा फोन आला अन् राजन साळवी गहिवरलेथेट रस्त्यावर उतरून काम

रत्नागिरी : 'राजन' मतदारसंघात काय परिस्थिती ? वादळाचा परिणाम किती ? नुकसान कुठपर्यंत ? कोरोनाची परिस्थिती काय ? असा आढावा घेतानाच 'राजन स्वतःची काळजी घेऊन काम कर, किती फिरतोस रे राजा', अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार राजन साळवी यांच्याशी थेट संवाद साधला तेव्हा आमदार राजन साळवी यांचे डोळे पाणावले !कोरोनाचे संकट धुमाकूळ घालत असतानाच चक्रीवादळाचे आगमन झाले.१४ मे रोजीच वादळाने परिणाम दाखवण्यास सुरुवात केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर हे वादळ पहिले राजापूरमध्ये धडकले. त्याचवेळी आमदार राजन साळवी यांनी थेट रस्त्यावर उतरून कामाला सुरुवात केली.अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ते सतत उपाययोजनासाठी मार्गदर्शन करत होते.

प्रत्यक्ष वादळाचा तडाखा बसल्यानंतर भूक तहान विसरून त्यांनी पूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला.ज्या-ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्तांना धीर देत स्वतः शक्य तितकी मदत केली. तसेच प्रशासनाला योग्य ते आदेश देखील दिले.या कामाची तत्काळ दखल शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. आणि बुधवारी रात्री अचानक राजन साळवी यांचा फोन खणखणला... समोरून चक्क उद्धव ठाकरे यांचा आवाज आला.....'राजन कसा आहेस ? वादळाचे परिणाम कुठपर्यंत ?किती नुकसान झाले ? मच्छीमार बांधवांचे किती नुकसान ? जीवितहानी नाही ना? असा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर कोरोना परिस्थितीची माहितीही त्यांनी घेतली.पुढचे वाक्य तर राजन साळवी यांना सदगदित करणारे होते. किती फिरतोस रे 'राजा' स्वतःची काळजी घेऊन काम कर, मी लवकरच तुमच्या भेटीसाठी येतोय. हे वाक्य कानावर पडताच राजध साळवी अक्षरशः गहिवरले. डोळे पाणावले. सदगदीत स्वरात म्हणाले 'साहेब तुमच्या कामातूनच प्रेरणा आणि ताकद मिळते आहे.

लगेच उद्धव ठाकरे यांचे पुढचे वाक्य होते. अरे मी काही नाही. तुझ्यासारखे शिवसैनिक हीच माझी ताकद, त्यामुळेच हे माझ्याकडून होत आहे. या शब्दाने तर आमदार राजन साळवी यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. साहेब स्वतःची काळजी घ्या, इतकेच शब्द त्यांच्या तोंडातून निघाले.

उद्धव ठाकरे यांनीही पुन्हा तू काळजी घे म्हणत संवाद थांबवला. कित्येक मिनिटे आमदार राजन साळवी शांत आणि स्तब्ध होते. पक्षप्रमुख आणि राज्याच्या प्रमुखाने केलेली ही विचारपूस आणि आपुलकी घेऊन ते पुन्हा मतदारसंघात पुढच्या भेटीसाठी रवाना झाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajan Salviराजन साळवीRatnagiriरत्नागिरीTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ