शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेच्या हक्काची, उदय सामंत यांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 11:35 IST

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते असून, ...

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते असून, त्यांना राज्याची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे तेच या जागेबद्दल निर्णय घेतील, असे मत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.मंत्री उदय सामंत शुक्रवारी (दि.६) रत्नागिरी दाैऱ्यावर आले हाेते. या दाैऱ्यात त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपले मोठे बंधू किरण सामंत यांना नागरिकांचा पाठिंबा असून, आग्रहही आहे. त्यांनी लोकसभेत जावे, असे मलाही वाटत आहे. परंतु, निवडणुकीसाठी त्यांनी उभे राहावे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.सध्या ते रत्नागिरीत मेळावे व शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत, त्यामुळे ते शिवसेनेमध्येच आहेत. त्यांनी निवडणूक लढवली तर तीही शिवसेनेमधूनच असेल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कोणी या मतदारसंघावर दावा केला तरी शिंदे - फडणवीस - पवार हेच मतदारसंघांबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्याचा प्रश्न निकाली निघेलनांदेड दुर्घटनेचे समर्थन करता येणार नाही. या प्रकारानंतर आपण तातडीने रत्नागिरी व रायगडमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनीही सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून भेटी देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे, असे स्वप्न आहे. ते पूर्ण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्याचा मोठा प्रश्न निकाली निघेल, असे मंत्री सामंत म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे घरात बसून काम करत नाहीतमुख्यमंत्री शिंदे यांचे आरोग्याच्या क्षेत्रात मोठे काम आहे. ते घरात बसू काम करत नाहीत किंवा कोणतेही आदेश फेसबुक लाइव्ह करीत नसल्याचा टोला मंत्री सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. शिंदे व ४० आमदारांवर गद्दार व खोके घेतल्याचा आरोप केला जातो, मग उद्धव ठाकरेंनी आता अजितदादा गद्दार आहेत, की खोके घेतले तेही एकदा जाहीर करावे, असे आव्हानही दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना