शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

नाणारच्या ७५ आंदोलनकर्त्यांना दिलासा, गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:09 IST

राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रकल्प विरोधकांनी केलेल्या विविध आंदोलनांनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे तब्बल ७५ आंदोलनकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये आमदार राजन साळवी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देनाणारच्या ७५ आंदोलनकर्त्यांना दिलासागुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशआमदारांसह पदाधिकाऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत

राजापूर : तालुक्यातील नाणार येथील प्रकल्प विरोधकांनी केलेल्या विविध आंदोलनांनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे तब्बल ७५ आंदोलनकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये आमदार राजन साळवी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.नाणार प्रकल्प रद्द करू, अशी ग्वाही देणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द करण्यास शासनाला भाग पाडले होते. त्यानंतर आता या भागातील प्रकल्प विरोधकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या प्रकल्पाविरुध्द आंदोलने केल्यामुळे कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम व त्यांचे २६ सहकारी यांच्यावर नाटे पोलीस स्थानकात एकूण तीन प्रकारचे गुन्हे दाखल केले होते.आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेच्या ३३ पदाधिकारी व शिवसैनिकांनी राजापूरच्या आमसभेदरम्यान शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३३ जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अटक करून जामीनावर सुटका केली होती.

यामध्ये तारळचे सरपंच बाळकृष्ण हळदणकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, पंचायत समिती सभापती अभिजीत तेली, माजी सभापती सुभाष गुरव, माजी बांधकाम सभापती अजित नारकर, विभागप्रमुख राजा काजवे, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, संजय पवार, दशरथ दुधवडकर, समीर चव्हाण, संंतोष कदम, प्रफुल्ल लांजेकर, युवासेना उपजिल्हा अधिकारी संतोष हातणकर, जिल्हा परिषद सदस्य सोनम बावकर, महिला तालुका आघाडीच्या योगिता साळवी, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, शरद लिंगायत, वसंत जड्यार, मंदरूळ सरपंच पौर्णिमा मासये, रामचंद्र सरवणकर, पंचायत समिती सदस्य अश्विनी शिवणेकर, प्रशांत गावकर, करूणा कदम, भारती सरवणकर, प्रमिला कानडे, राजन कुवळेकर, मधुकर बाणे, उमेश पराडकर, प्रकाश गुरव यांचा समावेश होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजापूर रोड रेल्वेस्टेशन आवारात लावलेल्या प्रकल्पाच्या फलकांना काळे फासले होते. त्यावेळीही पोलिसांनी अजित यशवंतराव व अन्य सोळा जणांविरुध्द गुन्हे दाखल केले होते.

विनाशकारी प्रकल्पामुळे आंबा बागायतदार, शेतकरी, मच्छिमार उद्ध्वस्त होणार होता. हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे, अशी स्थानिकांनी मागणी केली होती. त्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. राज्यात शिवशाही आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो.- राजन साळवी,आमदार

सक्षम आणि कार्यक्षम मुख्यमंत्री खुर्चीत बसल्यानंतर किती पटापट निर्णय होऊ शकतात, हे महाराष्ट्राने बघितले आहे. आंदोलन ज्यांनी ज्यांनी केली ती तिथल्या स्थानिक लोकांच्या विकासासाठी केलेली होती. प्रकल्प नको म्हणून केलेली होती. ती त्यांची भावना होती. ते काही ३२० किंवा ३०७चे गुन्हे नव्हते. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले, हा कोकणवासियांसाठी चांगला दिवस होता. भाजपवाले कोण कोणावर टीका करतात, हे बघायचे नाही. पाच वर्षात जे जमले नाही ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दाखविले.- उदय सामंत, शिवसेना उपनेते

शिवसेना जो शब्द देते त्याचे तंतोतंत पालन करते, हे या निर्णयाने दिसून आले आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधात लढणाऱ्या जनतेला शिवसेनेने कायम भक्कम पाठिंबा दिला होता. आमचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी उपनेते आमदार उदय सामंत यांनी सदैव प्रकल्पविरोधी जनतेला साथ दिली.- विलास चाळके,जिल्हाप्रमुख, शिवसेना

रिफायनरी प्रकल्पविरोधकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने रयतेचा राजा आहेत. जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आहे, असा मुख्यमंत्री आपण प्रथमच पाहात आहोत.- अशोक वालम, अध्यक्ष, कोकण महाशक्ती

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरी