निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत छोटू देसाई अकादमीला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:03+5:302021-03-20T04:30:03+5:30
१.रत्नागिरीतील शिवाजी स्टेडिअम येथे झालेल्या १० वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत कै.छोटू देसाई अकादमीचा संघ विजेता झाला. संघासोबत प्रशिक्षक दीपक देसाई, ...

निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत छोटू देसाई अकादमीला विजेतेपद
१.रत्नागिरीतील शिवाजी स्टेडिअम येथे झालेल्या १० वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत कै.छोटू देसाई अकादमीचा संघ विजेता झाला. संघासोबत प्रशिक्षक दीपक देसाई, राजू सावंत.
२. चिपळूण येथे झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कै.छोटू देसाई अकादमीने मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : या वर्षी प्रथमच चिपळूण व रत्नागिरी येथे झालेल्या वयोगट १०, १२ व १९ वर्षांखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कै.छोटू देसाई क्रिकेट अकादमीने विजेतेपद पटकावले आहे. मात्र, रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनच्या खुल्या गटातील टी-२० जिल्हा अजिंक्यपद स्पर्धत उपविजेते पदावर समाधान मानावे लागाले आहे.
मध्यंतरी रत्नागिरी येथे आलेल्या गडहिंगलज, बेळगाव व सावंतवाडी यांच्या १४ वर्षांखालील क्रिकेट सामन्यातही कै.छोटू देसाई क्रिकेट अकादमीने विजय संपादन केला होता. अकादमीच्या सर्व खेळाडूंनी सर्वोत्तम खेळ करताना सांघिक खेळाच्या प्रदर्शनामुळे त्यांना हा विजय प्राप्त झाला आहे. आता १३ वर्षांखालील संघ सावंतवाडी येथील सावंतवाडी प्रीमिअर लीग स्पर्धेकरिता दौऱ्यावर जात आहे.
अकादमीच्या खेळाडूंना सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रांमध्ये प्रशिक्षक वृंदावन पवार, राजू सावंत, शैलेश मदने, ओसामा परकार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक बाबा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे.