शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील चक्रधारी नारी...

By admin | Updated: June 28, 2014 00:30 IST

वैशाली चितळे : स्कूलबस चालविणारी पहिली महिला

चिपळूण : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगा उद्धारी’ असे स्त्रीचे आणि तिच्या कर्तृत्त्वाचे वर्णन केले जायचे. पण, सध्याच्या बदलत्या काळात या महिला पाळण्याच्या दोरीबरोबर संसाराच्या आर्थिक रथाचे सारथ्यही तितक्याच सक्षमपणे करत आहेत. चिपळुणात स्कूल बस चालवणाऱ्या वैशाली चितळे या महिलेचे उदाहरण त्यासाठी खूपच बोलके आहे. दिवसभराचे त्रासदायक ‘शेड्युल’ असलेल्या या क्षेत्रातील ही जिल्ह्यातील पहिलीच महिला आहे.चिपळूणसारख्या फारसे विकसित न झालेल्या शहरात वैशाली चितळे या दररोज शाळेत मुलांची वाहतूक करतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्कूल बस चालविणारी ही महिला कौतुकास पात्र ठरत आहे. त्यामुळे चितळे या साहजिकच कळत-नकळत ‘ती चक्रधारी नारी’ म्हणून पालकांबरोबरच अन्य रिक्षाचालक, स्कूलबस चालक-मालक यांच्यामध्ये परिचित आहेत. ऐश्वर्यसंपन्न माहेरातून आलेल्या चितळे यांना या कामासाठी सासरकडूनही प्रोत्साहन मिळत आहे. लग्नानंतर त्यांनी लोटे एमआयडीसीमध्ये सात वर्षे नोकरी केली. त्यांचे पती राजेश हे पूर्वी रिक्षातून मुलांची वाहतूक करीत असत. आपणही चारचाकी वाहन चालवता येत असल्याने नोकरीपेक्षा मुलांची स्कूलबस काढावी, असा निश्चय करुन त्यांनीही यात पाऊल टाकले आणि यश मिळविले. सात वर्षांपेक्षा अधिक काळ स्कूल बसचा व्यवसाय करीत असताना चितळे यांना सुरुवातीला अनेक चांगले वाईट अनुभव आले. परंतु, जिद्द न सोडता प्रत्येक गोष्टीला व प्रतिस्पर्ध्यांशी जुळवून घेत सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर हळूहळू येथील सर्व रिक्षा चालक - मालक यांनीही मोलाची साथ देत वेळप्रसंगी सहकार्य केले. एक महिला म्हणून आज सर्वांच्या सोबतीने चांगला मान मिळत आहे. आज अनेक महिला दुचाकी, चारचाकी शिकवा म्हणून सतत विचारणा करीत असतात. पण वेळेअभावी ते शक्य होत नाही. सकाळी ६.३० ते संध्याकाळी ६.३०पर्यंत शाळेतील मुलांना घेऊन धावता प्रवास सुरु असतो. या व्यवसायाला सासुबाई राजश्री चितळे व नणंद दीपाली यादेखील माझ्या दहा वर्षांच्या मुलीला, आदितीला सांभाळून मदत करतात. या कामासाठी अनेकांनी आपला गौरवही केल्याचेही त्या सांगतात. त्यांचा आदर्श अन्य महिलांनी ठेवावा. (प्रतिनिधी)