शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘मास्टर ट्रेड’कडून फसवणूक

By admin | Updated: November 1, 2015 00:12 IST

दापोलीत गंडा : विसापुरातील ग्रामस्थांची पोलिसांत धाव

 खेड : रोखीच्या गुंतवणुकीवर ठराविक परतावा परत करण्याचे आमिष दाखवून पुणे येथील मास्टर ट्रेड लिंक कंपनीने दापोली तालुक्यातील विसापूर येथील इकबाल अली मालवणकर यांना ५ लाख रूपयांना फसवल्याचे समोर आले आहे. मालवणकर यांनी याप्रकरणी दापोली पोलिसात धाव घेतली आहे. इकबाल मालवणकर हे विसापूर येथील रहिवासी आहेत. कंपनीचे संचालक संतोष पोपट थोरात (पुणे), नितीन मुरलीधर निकम आणि सोमनाथ बाबुराव सक्रे तसेच कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे हाशीम हुसेन पेटकर (जामगे) आणि मुस्ताक युसूफ कालसेकर (जामगे, दापोली) यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. ५ लाख रूपयांची गुंतवणूक ही ३० महिन्यांकरीता असून, ही मुदत संपल्यानंतर ५ लाख रूपये मालवणकर यांना परत मिळतील, असेही या प्रतिनिधींनी सांगितले होते. त्याप्रमाणे कंपनीला १९ डिसेंबर २०१४रोजी आयसीआयसीआय बँकेचा ५ लाख रूपयांचा धनादेश मालवणकर यांनी कंपनीला दिला़ यानंतर मात्र कंपनीचा व्यवहार संशयास्पद राहिला आहे. कंपनीकडून १४.०३.२०१५ रोजी २६ हजार ९०१ रूपये आणि १६.०४.२०१५ रोजी २६ हजार ९०० रूपये दापोली येथील मालवणकर यांच्या बँक खात्यात जमा झाले़ त्यानंतर २४.०२.२०१५ रोजीचा संतोष पोपट थोरात यांची सही असलेला आणि साक्षीदार हाशीम हुसेन पेटकर यांची सही असलेला सामंजस्य करार मालवणकर यांना देण्यात आला. त्यानंतर मे २०१५पासून मात्र कंपनीकडून मालवणकर यांना मासिक परतावा मिळणे बंद झाले, असे तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी) आमिष दाखवले : तिघांविरोधात तक्रार दाखल ही कंपनी ठराविक रक्कमेच्या गुंतवणुकीवर प्रती महिना परतावा देण्याचा व्यवसाय करत असल्याचे या प्रतिनिधींनी इकबाल मालवणकर यांना सुरूवातीला सांगितले होते. मात्र त्यानंतर या कंपनीने फसवणुकीस प्रारंभ केला. ५ लाख गुंतवणूक केल्यानंतर एक लाख रूपयांना प्रती महिना ५ हजार ४०० रूपये अदा केले जातील, असे मालवणकर यांना सांगण्यात आले. संतोष पोपट थोरात, हाशीम हुसेन पेटकर आणि मुस्ताक युसूफ कालसेकर यांनी संपर्क साधून कंपनीच्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली़