शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीमुळे कोकणात हवापालट; आंबा, काजूपीक धोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 16:44 IST

मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे हवामानात बदल झाला आहे. दिवसा उष्मा व रात्री कडाक्याची थंडी, तर मध्येच दिवसा ढगाळ हवामान व रात्री थंडी अशा संमिश्र हवामानामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम होत आहे

रत्नागिरी : मराठवाड्यात झालेल्या गारपिटीमुळे हवामानात बदल झाला आहे. दिवसा उष्मा व रात्री कडाक्याची थंडी, तर मध्येच दिवसा ढगाळ हवामान व रात्री थंडी अशा संमिश्र हवामानामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम होत आहे. फेब्रुवारी निम्मा संपला तरी शेतकऱ्यांना फवारण्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागत आहे. शिवाय आतापर्यंत वेळोवेळी केलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्च वाया गेला आहे.

यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्याने सुरूवातीला किनारपट्टीलगतच्या बागायतींमध्ये मोहोर प्रक्रिया सुरू झाली. परंतु डिसेंबरमध्ये झालेल्या ओखी वादळानंतर मोहोर कुजला, फळे गळली. जानेवारीमध्ये परत मोहोर आला. दुबार मोहोर आल्यामुळे फळांची गळ झाल्याने कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला. हवामानातील बदलामुळे  तुडतुडा, खार (बुरशीजन्य), थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला.  दुसऱ्या  टप्प्यातील मोहोराला परागीकरणाअभावी फळधारणा अत्यल्प झाली. थंडीमुळे झाडावर ताण आला होता. परंतु उष्मा वाढल्यामुळे पुनर्मोहोर सुरू झाला. फळधारणा झाली असताना मोहोरामुळे पुन्हा एकदा फळगळ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला. मोहोर व आंब्याच्या संरक्षणासाठी यावर्षी फवारणीचा खर्च अधिक झाला. 

 दोन वेळा फळधारणा होऊनही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. किमान सात ते आठ वेळा शेतकऱ्यांना फवारणी करावी लागली आहे.  एकाच झाडाला तीनवेळा मोहोर आला. या मोहोराला फळधारणा सुरू झाली आहे. फळधारणा झालेला आंबा मे मध्येच तयार होण्याची शक्यता आहे. सध्या कणी ते वाटाणा या आकारात फळधारणा झाली आहे. हा आंबा  एकाच वेळी बाजारात आल्यास दर कोसळण्याची भीती आहे.

कीटकनाशकांचा दर वधारला किमान तापमानामुळे तुडतुड्याचा प्रभाव वाढत आहे. तुडतुडा पूर्णपणे नष्ट होत नसल्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत आहेत. बागायतदारांनी सुरूवातीपासून वेळोवेळी केलेल्या फवारणीचा खर्च वाया गेला आहे. जीएसटीमुळे कीटकनाशकांचा दर वधारला आहे. लाकडी खोका (पिंजरा)  मजुरीच्या दरात वाढ तसेच इंधनाचे सातत्याने वाढणारे दर विचारात घेता वाहतूक खर्च वाढल्यामुळे आंबापीक उत्पादन खर्चिक बनले आहे. मात्र, त्या तुलनेत आंब्याला हमीभाव मिळत नाही. तुकाराम घवाळी, बागायतदार रत्नागिरी  

मुंबई मार्केटमध्ये जाणारा आंबा अल्पसध्या मुंबई मार्केटमध्ये आंबा पाठवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र त्याचे प्रमाण अल्प आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यातून आंबा पाठवण्यात येत असला तरी सर्वाधिक आंबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठविला जात आहे. कोकणातून ३०० ते ४०० पेट्या दररोज पाठवण्यात येत असल्या तरी सिंंधुदुर्गमधील आंबा अधिक आहे. तीन हजार ते सहा हजार रूपये पेटीला दर मिळत आहे. यावर्षी पहिल्या टप्प्यातील ओखी वादळातून वाचलेला आंबा बाजारात विक्रीसाठी आला आहे. परंतु याचे प्रमाण अल्प असल्यामुळे थोड्या दिवसानंतर याला ब्रेक मिळणार आहे. 

गुढीपाडव्यानंतर आंबा बाजारात ?दहा वर्षांपूर्वी शेतकरी गुढीपाडव्याला आंब्याची तोड करत असत, यावर्षीदेखील गुढीपाडव्यानंतरच आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादन घटले आहे. ढगाळ हवामानामुळे आंबा मोहोरावर करपा, भुरी, तुडतुड्याचा प्रभाव वाढत आहे. काजू पिकावर ढेकण्या (टी-मॉस्किटो) या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ हवामानामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत.

टॅग्स :HailstormगारपीटRatnagiriरत्नागिरी