रत्नागिरी : रत्नागिरी व रायगडसह राज्यातील पुणे, सातारा आणि नंदुरबार या जिल्ह्यात येत्या चार तासात विजांच्या कडकडाटसह वादळी पावसाचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. या कालावधीत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरीही लावली आहे. मंडणगड, चिपळूण, दापोली या भागात पावसाने मंगळवारी सकाळी तुरळक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती.अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात येत्या चार तासात वादळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी तुरळक पाऊस
By शोभना कांबळे | Updated: March 21, 2023 16:47 IST