राष्ट्रवादीतर्फे लवकरच लोटे येेथे चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:09+5:302021-03-20T04:30:09+5:30
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या अपघातांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक अपघात घडूनही कारवाई ...

राष्ट्रवादीतर्फे लवकरच लोटे येेथे चक्काजाम आंदोलन
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या अपघातांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक अपघात घडूनही कारवाई केली जात नसल्याने आता लोटे येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.
अनेक कंपन्या या अनधिकृतपणे सुरू असून, या कंपन्यांमध्ये सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्यामुळेच तेथे सातत्याने स्फोटांसारखे गंभीर अपघात घडत आहेत. यात अनेकांचे जीव जात असून, अनेकजण कायमस्वरूपी अपंग होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. येथील औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. आपण राष्ट्रवादी पार्टीतर्फे लवकरच लोटे येेथे चक्काजाम आंदोलन करून संबंधितांना घेराव घालणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.