रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव
By रहिम दलाल | Updated: October 1, 2022 15:14 IST2022-10-01T15:13:58+5:302022-10-01T15:14:19+5:30
Ratnagiri Zilla Parishad: जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शासनाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शासनाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण महिलेसाठी जाहीर झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांना चांगलाच हिरमोड झाला आहे.
राज्यात रत्नागिरीसह सातारा जिल्हा परिषदेचे महिला आरक्षण पडले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूकांचे वारे आतापासूनच वारे वाहू लागले आहेत.
मागील ५ वर्षाच्या सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. त्यावेळी रत्नागिरीच्या स्नेहा सावंत आणि लांजाच्या स्वरूपा साळवी यांना प्रत्येकी सव्वा वर्षसाठी संधी मिळाली हा होती. तर पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारणसाठी होते,. त्यावेळी शिवसेनेचे रोहन बने यांच्यानंतर सव्वा वर्षासाठी राष्ट्रवादीचे विक्रांत जाधव हे अध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा ओबीसी महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.