शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 11:44 IST

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता हा अपघात घडला.

साखरपा : दाट धुके आणि काळोखामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने सिमेंट घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार झाला. अजय नीळकंठ शिंदे (वय-२५, रा. मठ धामापूर, ता. संगमेश्वर) असे या मृत चालकाचे नाव आहे. हा अपघात संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता घडला. याबाबत माहिती अशी की, अपघातग्रस्त ट्रक (एमएच ०४, केएफ ९८४१) रत्नागिरीहून बुधवारी (दि.२२) रात्री कोल्हापूरकडे सिमेंट घेऊन चालला होता. हा ट्रक संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - वाणीवाडी दरम्यान आला असता दाट धुके आणि काळोखामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. यामध्ये अजय शिंदे हा चालक ट्रकखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.ट्रक उलटताच मोठ्याने आवाज आल्याने ग्रामस्थ खडबडून जागे झाले. आवाजाच्या दिशेने ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. मात्र, काळोखामुळे ग्रामस्थांना मदत कार्यात अडचण येत होती. सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ट्रक खाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याची ओळख पटली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू