सीबीएसई दहावीचा रत्नागिरीचा ९७.९४ टक्के निकाल, शिवम बेंद्रे जिल्ह्यात प्रथम
By मेहरून नाकाडे | Updated: May 12, 2023 19:35 IST2023-05-12T19:29:17+5:302023-05-12T19:35:57+5:30
सीबीएसई माध्यमाचा दहावीचा निकाल जाहीर

सीबीएसई दहावीचा रत्नागिरीचा ९७.९४ टक्के निकाल, शिवम बेंद्रे जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी : सीबीएसई माध्यमाचा दहावी चा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल ९७.९४ टक्के लागला आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १६ शाळेतून ३९३ विद्यार्थी, ३३८विद्यार्थिनी मिळून एकूण ७३१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ७१६ विद्यार्थी पास झाले असून १५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यातून शिवम बेंद्रे ( नवनिर्माण हायस्कूल, रत्नागिरी) याने ९८ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. केवल खापरे (रोटरी स्कूल, खेड) याने ९७.२७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अभिषेक पाटील ( पोतदार स्कूल, रत्नागिरी) याने ९७.६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सीबीएसई माध्यमाच्या जिल्हा समन्वयक नजमा मुजावर यांनी अभिनंदन केले आहे.