शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल; गाडी लावतो म्हणत झाला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:00 IST

थार जीप उलटून चालक गाडीतून बाहेर फेकला गेला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

दापोली : तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी भरधाव वेगाने वाहन चालवताना थार जीप उलटून अपघात झाला . या अपघातात चालक गाडीतून बाहेर फेकला गेला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर चालक गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा अपघात ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास कर्दे येथील समुद्रकिनारी झाला हाेता. कर्दे येथील पोलिस पाटील सोनल संदीप खामकर (वय ४५) आणि स्थानिक रहिवासी राकेश जाधव यांना समुद्रकिनाऱ्यावर एक थार जीप (एमएच १२, एक्सटी १७८८) भरधाव वेगाने जाताना दिसली. चालक जीप धोकादायक पद्धतीने, वर्तुळाकार वळणे घेऊन चालवत होता, ज्यामुळे स्वतःच्या आणि इतर पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. याच दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती उलटली. अपघातानंतर चालक गाडीतून बाहेर फेकला गेला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पाेलिस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उलटलेली जीप सरळ केली.या घटनेची फिर्याद पोलिस पाटील सोनल खामकर यांनी दिल्यानंतर अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यादव करत आहेत.

गाडी सुरक्षित ठिकाणी लावतोसमुद्रकिनाऱ्यावर उलटलेली गाडी पाेलिस पाटील आणि तेथील स्थानिकांनी मदत करून सरळ केली. याच संधीचा फायदा घेत ‘गाडी सुरक्षित ठिकाणी लावतो’ असे सांगून चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पाेलिसांनी गाडीच्या क्रमांकावरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.