कारला दुचाकीची धडक, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST2021-05-08T04:32:31+5:302021-05-08T04:32:31+5:30

रत्नागिरी : समोरुन येणाऱ्या कारला धडक देत अपघात केल्याप्रकरणी दुचाकीचालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ...

Car hit by two-wheeler, crime filed | कारला दुचाकीची धडक, गुन्हा दाखल

कारला दुचाकीची धडक, गुन्हा दाखल

रत्नागिरी : समोरुन येणाऱ्या कारला धडक देत अपघात केल्याप्रकरणी दुचाकीचालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार, ५ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बसणी येथील नागझरी फाटा येथे घडली. याप्रकरणी तेजस उपेंद्र कांबळे (वय २५,रा. सोमेश्‍वर बौध्दवाडी,रत्नागिरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तेजस कांबळे हा बुधवारी दुपारी आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच ०८, एएस ३००६) वरून तेजस पवार (वय २३, रा. सोमेश्‍वर बौध्दवाडी,रत्नागिरी) याला पाठीमागे बसवून गणपतीपुळे ते रत्नागिरी असा येत होता. तो बसणी येथे आला असता त्याने रत्नागिरी ते कोतवडे जाणारी कार (एमएच ०१, डीके ०३५७) हिला समोरुन डाव्या बाजूला धडक देत अपघात केला. यात तेजस कांबळे आणि तेजस पवार हे दोघेही जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

Web Title: Car hit by two-wheeler, crime filed