शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

आंबा घाटात ३०० फूट खोल दरीत कार कोसळली; चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 11:11 IST

अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आंबा : येथील घाटातील विसावा पॉईटवरुन कार तीनशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. संजय गणेश जोशी (वय-६०, रा. राजारामपुरी, ५ वी गल्ली, कोल्हापूर.) असे त्यांचे नाव आहे. अपघात सकाळी अकराच्या सुमारास झाला. या अपघाताची साखरपा पोलीस ठाण्यात नोंद झाली.

अधिक माहिती अशी की, आज सकाळी जोशी हे घाट उतरताना त्यांची मोटार (नं एमएच ०९ डी. ए.१०९९) विसावा या प्रेक्षणीय पॉईंटवर रस्ता सोडून पन्नास फूट दरीकडे जाऊन सुमारे तीनशे फूट दरीत कोसळली. तिसऱ्या टप्प्यावर जोशी गाडीतून बाहेर फेकले गेले व ओघळीत कोसळले. गाडीच्या अलीकडे पन्नास फुटांवर त्यांचा मृतदेह पडला होता. डोके फुटल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. कार दरीच्या तळात जाऊन विसावली.

बारा वाजता साखरपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबा व साखरपा येथील मदत पथके झुडपांचा आधार घेत दरीत उतरले. बारा ते चार अशा चार तासांच्या अथक प्रयत्नाने मृतदेह बाहेर काढला गेला. या मदतकार्यात राहुल गायकवाड, राजू काकडे, आंबा येथील दिनेश कांबळे, दिग्विजय गुरव, सुनील काळे, राहुल बोंडे, अक्षय महाडिक, राजेश गायकवाड यांनी योगदान दिले.विसावा पॉईंटला बांधलेले लोखंडी ग्रिल दोन वर्षांपासून दुरवस्थेत आहे. ते मजबूत असते तर दुर्घटना टळली असती. पाच वाजता मृतदेह साखरपा रुग्णालयात शवविच्छेदनास नेला. देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पी. एस. आय. विद्या पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात