शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

उमेदवारीसाठी रंगली घरातच हमरा-तुमरी, मनधरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:25 IST

gram panchayat Election Ratnagiri - रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्षातील इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी आपल वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी पक्षातील वरिष्ठांची मनधरणी करण्यास सुरूवात केली असून, उमेदवारीवरून घरातच दोन गट पडून भावकीतच कंदाल झाल्याचा प्रकार शहराजवळच्या एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडला.

ठळक मुद्देउमेदवारीसाठी रंगली घरातच हमरा-तुमरी, मनधरणी सुरू काका -पुतणे भिडले एकमेकांना, कोणाला तिकीट मिळणार? राजकीय बैठकांना सुरूवात

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्षातील इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी आपल वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी पक्षातील वरिष्ठांची मनधरणी करण्यास सुरूवात केली असून, उमेदवारीवरून घरातच दोन गट पडून भावकीतच कंदाल झाल्याचा प्रकार शहराजवळच्या एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडला.जिल्ह्यात शिवसेनाच मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात शिवसेनेची पकड अधिक असल्याने पक्षातील इच्छुकांची संख्याही अधिक आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमदेवारांनी स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार याच नेत्यांकडे असल्याने त्यांच्याकडे जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र, सध्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारीवरून घरातच वाद होण्याचे प्रसंग घडू लागले आहेत.शहराजवळच्या शिवसेनेचे वजन असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याच्या वडिलांनी पुन्हा मुलासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, घरी येताच त्याच्या भावाला तिकीट दिल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे दोन भावातच जुंपली.

एवढ्यावरच न थांबत काका - पुतणेही एकमेकांसमोर उभे ठाकले. या प्रकारामुळे आता घरातच दोन गट निर्माण झाले आहेत. विद्यमान सदस्याच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घालण्यासाठी वडील उत्सुक आहेत. तर दुसरीकडे पुतण्याही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे घरातूनच आता घमासान सुरु झाले आहे.आरक्षणाकडे लक्षजिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण उशिराने पडणार असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाकडे डोळा ठेवून असलेले इच्छुक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. मनासारखे आरक्षण पडले नाहीत तर काय करायचे, असा प्रश्न सतावत आहे. त्यातच महिला आरक्षण पडले तर काय? निवडणुकीत स्वत: उभे राहावे की घरातील महिलेला तिकीट द्यावे हा संभ्रमच आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी