बस धावली ६० किलाेमीटर भाडे मिळाले १२० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:31 IST2021-04-11T04:31:07+5:302021-04-11T04:31:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पावस : शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनला पावस परिसरातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांशी दुकाने बंद ठेवण्यात आल्याने ...

बस धावली ६० किलाेमीटर भाडे मिळाले १२० रुपये
लाेकमत न्यूज नेटवर्क
पावस : शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनला पावस परिसरातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांशी दुकाने बंद ठेवण्यात आल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. लाॅकडाऊनच्या काळात पावस एस. टी. आगारातून ठरावीकच गाड्या साेडण्यात आल्या. त्यामुळे बसच्या एका फेरीो अंतर ६० किलोमीटर आणि प्रवासीभाडेपोटी जमा झाले मात्र १२० रुपये, अशी स्थिती निर्माण झाली हाेती.
पूर्णगड सागरी पोलीस स्थानकाचे पाेलीस निरीक्षक सुरेश गावीत यांनी शुक्रवारी सायंकाळी पावस परिसरातील जनतेला आवाहन केले होते. त्यांनी विनाकारण कोणीही बाहेर पडू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला हाेता. त्यामुळे शनिवारी सगळीकडे शुकशुकाट होता. पावस परिसरात अत्यावश्यक सेवा असलेल्या दुकानांकडेही ग्रामस्थांनी पाठ फिरवली हाेती. रात्रीच्या वेळी संचारबंदी असल्याने अनेक जण रात्रीच्या वेळी फिरण्याचे टाळत आहेत. काेराेना संसर्गाला रोखण्यासाठी मदत व्हावी याकरिता नागरिकांनी शनिवारी घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे परिसरात प्रथमच शुकशुकाट दिसत होता. नोकरदार वर्गाला सवलत दिल्यामुळे काही ठरावीक लोक कामानिमित्त बाहेर पडले हाेते.
अत्यावश्यक सेवा म्हणून परिवहन महामंडळाने एस. टी.ची सोय केल्यामुळे काही लोक जात होते. परंतु, म्हणावा तसा प्रतिसाद गाड्यांना मिळत नव्हता. त्यामुळे एस. टी.च्या अनेक बसफेऱ्या रिकाम्या जात होत्या.