चिपळुणात घरफोडीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:38 IST2021-09-08T04:38:13+5:302021-09-08T04:38:13+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरातील दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा खेर्डी मोहल्ला येथे बंद घर ...

The burglary season continues in Chiplun | चिपळुणात घरफोडीचे सत्र सुरूच

चिपळुणात घरफोडीचे सत्र सुरूच

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : शहरातील दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा खेर्डी मोहल्ला येथे बंद घर फोडून चोरट्याने तब्बल १ लाख २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

रेश्मा भालेकर (३९, कोकण हेरिटेज, खेर्डी-मोहल्ला) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भालेकर यांचे राहते घर बंद आहे. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी ४ ते ५ सप्टेंबर या कालावधीत घराच्या दर्शनी दरवाजाची कडी लावलेले बंद कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख २० हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले. हा प्रकार भालेकर यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस स्थानकात दिली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: The burglary season continues in Chiplun