चिपळुणात घरफोडी, लाखोंचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:34 IST2021-03-23T04:34:18+5:302021-03-23T04:34:18+5:30
चिपळूण : कराड मार्गावरील पिंपळीवरचीवाडी येथे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

चिपळुणात घरफोडी, लाखोंचा ऐवज लांबविला
चिपळूण : कराड मार्गावरील पिंपळीवरचीवाडी येथे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकांत चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चिराग कृष्णा तारये (वय २८, रा.पिंपळी खुर्द वरचीवाडी) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारये हे १८ ते २१ मार्च या कालावधीत घर बंद करुन बाहेर गेले होते. घर बंद असल्याच्या संधीचा फायदा घेत, चोरट्याने घराच्या दर्शनी दरवाजाची कडी कोणत्या तरी लोखंडी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील दोन्ही बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले ४ लाख २ हजार ९ ५० रुपये किमतीचे दागिने तर २ हजार रुपये असा ऐवज चोरून नेला. हा प्रकार तारये यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी याबाबत पोलीस स्थानकात माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, अधिक तपास पाेलीस करत आहेत.