बिल्डरवर फौजदारी कारवाई करावी

By Admin | Updated: January 29, 2015 23:28 IST2015-01-29T21:52:38+5:302015-01-29T23:28:16+5:30

सुधाकर कदम : बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी.

Builder should take criminal action | बिल्डरवर फौजदारी कारवाई करावी

बिल्डरवर फौजदारी कारवाई करावी

चिपळूण : नवीन कोळकेवाडी खांदाट येथे निसर्ग नावाने बांधण्यात आलेली इमारत अनधिकृत आहे. हे बांधकाम जमीनदोस्त करुन बिल्डरवर एमआरटीपी कायद्याप्रमाणे फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सुधाकर कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. चिपळूण तालुक्यातील नवीन कोळकेवाडी खांदाट येथील कदम यांनी आपल्या मिळकतीतील वडिलोपार्जित घर बांधण्यासाठी २० गुंठे जागा टेरव येथील शरद पर्वतराव कदम यांना ओळखीचे असल्याने दिली. याबाबत कदम यांनी रितसर खरेदीखत करुन नोंदविले. या जमिनीचा व्यवहार १२ लाखाला ठरला असताना कदम यांनी केवळ २ लाख रुपये दिले म्हणून विचारणा केली असता सर्वच रक्कम पेपरवर लिहिली तर टॅक्स बसेल, असे सांगून उर्वरित रक्कम इमारतीच्या बांधकामादरम्यान देईन, असे सांगितले. परंतु, आजअखेर रक्कम न देता माझी फसवणूक केली आहे, असे कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बिल्डर कदम यांनी आपल्या मिळकतीत अर्धे इमारतीचे बांधकाम सुरु केले म्हणून आपण ग्रामपंचायतीकडे सन २०१२ आणि २०१३मध्ये तक्रार अर्ज दिला. परंतु, कार्यवाही झाली नाही. म्हणून २६ डिसेंबर २०१४ रोजी तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच यांना बांधकाम जमीनदोस्त करण्याबाबत मागणी करणारे निवेदन दिले. त्यावरही योग्य ती कारवाई झाली नाही. नियमबाह्य व बेकायदेशीर बांधकामाला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप सुधाकर कदम यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित बिल्डरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
यावेळी जागरुक मंचचे तानू आंबेकर, विजय भागवत, अविनाश सकपाळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Builder should take criminal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.