शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या प्राण्यांमधील संवेदनशीलता! वाहून जाणाऱ्या गायीला म्हशींनी वाचवलं, रत्नागिरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:35 IST

अनोखी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी अशी घटना

विनोद पवार राजापूर : प्राण्यांना बोलता येत नसले तरी त्यांच्याकडे भावना मात्र माणसासारख्याच असतात. बुडणाऱ्या, वाहून जाणाऱ्या गाय-म्हशीला, कुत्र्याला एखाद्या प्राणीप्रेमी तरुणाने वाचवल्याची घटना आपण ऐकतो, वाचतो, बघतो. पण वाहून जाणाऱ्या एका गायीला चक्क तीन म्हशींनी वाचवण्याची आश्चर्यकारक घटना राजापूर येथे घडली आहे. राजापूर नगर परिषदेचे कर्मचारी संदेश जाधव यांनी हा अनोखा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.आज, शुक्रवारी सकाळी राजापूर शहरात ही घटना घडली आहे. अर्जुना नदीच्या पात्रालगत असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यावरुन एक गाय नदीपात्र पडून वाहून जात होती. जवळच असलेल्या तीन म्हशींनी नदीत उडी टाकत त्या गायीचे प्राण वाचवले आहेत.गुरुवारी आठवडा बाजार असल्यामुळे त्याठिकाणी जमा झालेला कचरा गोळा करण्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरु राजापूर नगर परिषदेचे सफाई कामगार करत होते. या ठिकाणी राजापूर नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी संदेश जाधवही उपस्थित होते. साधारण सकाळी साडेआठच्या सुमारास राजापूर बंदर धक्क्यावर स्वच्छतेचे काम सुरु असताना ही गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यावरुन पाण्यात पडली.

अर्जुना नदीचा प्रवाह जोरदार असल्याने ती वाहून जाऊ लागली. याचवेळी त्याठिकाणी असणाऱ्या तीन म्हशींनीही लागलीच पाण्यात उड्या मारल्या व त्या बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूंनी आधार देत, किंबहुना तीनही बाजूंनी कव्हर करून पलिकडच्या किनाऱ्यावर नेले.पलिकडे नदीपात्राच्या बाहेर गेल्यानंतर या गायीने मागे वळून अतिशय कृतज्ञतापूर्वक त्या तिन्ही म्हशींकडे एक कटाक्ष टाकला व ती गेली. त्यानंतर या तिन्ही म्हशी नदीपात्राच्या बाहेर आल्या. मुक्या प्राण्यांमधील संवेदनशीलता अनेकदा माणसांपेक्षा अधिक असल्याचे या घटनेवरून दिसून येते. राजापूरमधील ही घटनाही अशीच अनोखी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी.