बीएसएनएलकडून ‘महाकृषी’ ग्राहकांना ‘अमर्याद’ भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:00 IST2018-11-24T17:58:15+5:302018-11-24T18:00:12+5:30
गतवर्षी भारतीय दूरसंचार निगमने (बीएसएनएल) ‘महाकृषी’ ग्राहकांना नाराज केले असले तरी आता अमर्याद संभाषणासह १.५ जीबीचा डेटा प्रतिदिन अशी आकर्षक योजना जाहीर करून देऊन खुश

बीएसएनएलकडून ‘महाकृषी’ ग्राहकांना ‘अमर्याद’ भेट
रत्नागिरी : गतवर्षी भारतीय दूरसंचार निगमने (बीएसएनएल) ‘महाकृषी’ ग्राहकांना नाराज केले असले तरी आता अमर्याद संभाषणासह १.५ जीबीचा डेटा प्रतिदिन अशी आकर्षक योजना जाहीर करून देऊन खुश केले आहे.
‘बीएसएनएल’कडून कृषी कार्डधारकांच्या ‘महाकृषी’ या योजनेत सातत्याने बदल होत आहेत. गेल्या वर्षी बीएसएनएलने महाकृषी योजनेत बदल करून ३० दिवसांच्या वैधतेसह १४१ रूपयांमध्ये १ जीबी डेटा प्रति दिन, १ हजार मिनीटांचे संभाषण मोफत आणि १०० एसएमएस अशी योजना जाहीर केली होती. तसेच ७७६ रूपयांमध्ये अर्ध वार्षिक (टङर776) व १५५१ रूपयांमध्ये वार्षिक (टङर1551) असा बदल केला होता.
मात्र, मोफत मिनीटांच्या संभाषणात घट केल्याने ‘कृषी’च्या धारकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, इतर खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी बीएसएनएलनेही कंबर कसली असल्याने महाकृषी योजनेत विशेष बदल केला आहे.
महाकृषी योजनेत केलेल्या बदलानुसार आता या योजनेत ३० दिवसांच्या वैधतेसह १४१ रूपयांमध्ये १.५ जीबी प्रति दिन डेटा, अमर्यादित संभाषण आणि २०० एसएमएस करता येणार आहेत. तसेच ७७६ रूपयांमध्ये अर्ध वार्षिक (टङर776) व १५५१ रूपयांमध्ये वार्षिक (टङर1551) ही योजना तशीच ठेवण्यात आली आहे
नव्या महाकृषी योजनेत १४१ रूपयांमध्येच आता अमर्याद संभाषणासह १.५ जीबी प्रति दिन डेटा आणि २०० एसएमएस मिळणार आहे. तसेच अर्धवार्षिक व वार्षिक योजनाही मिळणार आहे. त्यामुळे महाकृषीचे ग्राहक बीएसएनएलच्या या नव्या योजनेचे स्वागत करतील, हे निश्चित.